मुंबई | त्रिपुरामध्ये मशिदीवर हल्ला झाल्याचे कथीत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्रिपुरासह महाराष्ट्रात देखील यांचे पडसाद उमटल्याचे पहायला मिळाले. अमरावतीमध्ये दंगल उसळली होती. जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. यावर प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक गंभीर इशारा दिला आहे.
अमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रात झाल्यास सोडायचं नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray)यांचा एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नवीन वर्षापासून धुमधडका सुरू करू. येथून परत घरी जाल त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर आणि घराजवळील चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा पाहिजे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय.
आमरावतीसारखा प्रयत्न पुन्हा महाराष्ट्रातत झाल्यास सोडायचं नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, लोकांचा विश्वास संपादन करा. एकदा विश्वास संपादन केला तर निवडणुकीत तुम्हाला मत मागण्याची गरज पडणार नाही. सगळी राजकारणी तुम्हाला जाती-जातीत विभागून ठेवत आहे, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. आमरावतीसारख्या घटना घडवून महराष्ट्राचं वातावरण अस्थिर केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट”
“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”
रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले…
महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा