पुणे | राज्याच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या झंझावाती राजकीय दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ठाकरे सध्या पुण्याचा दौरा करत आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून राज ठाकरेंनी आक्रमक हिंदूत्त्वाचा स्विकार करत राज्य सरकारला मोठ्या अडचणीत टाकलं आहे. हनुमान चालीसा हा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा सर्वांसमोर मांडला आहे.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यात मोठा वाद झाला होता. त्यानंतर राज्य गृह विभागाकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देखील बजावण्यात आल्या होत्या.
आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पुण्यात अक्षरधारामध्ये पुस्तक खरेदी करण्यासाठी राज ठाकरे गेले होते.
पुस्तक घेण्यासाठी जात असताना पत्रकारांनी प्रश्न विचाराण्यारचा प्रयत्न केला तेव्हा राज ठाकरे त्यांच्यावर चिडून जगू द्याल की नाही?, असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला.
सध्या राज ठाकरेंच्या याच सवालाची चर्चा आहे. राज ठाकरे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. मात्र थेट पत्रकारांनाच ठाकरेंनी रडारवर घेतल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पुणे महापालिकेसाठी सर्व पक्षांनी तयारी चालू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा