मुंबई | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना 300 घरे देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता.
अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यावेळी त्यांनी एकमेव आमदार राजू पाटील यांचं कौतुक देखील केलं आहे.
साला आमदारांना कसली घर विकताय?, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. आमदारांना घरी दिलं पाहिजे आणि त्यांची फार्म हाऊस घेतली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. आमदारांना पेन्शन देणं कट केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, जातीच्या राजकारणावरून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला सारून काम न करणाऱ्यांना तुम्ही सत्तेवर बसवलं, मग काम करून काय फायदा, असंही राज ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
Raj Thackeray: राज ठाकरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका, म्हणाले…
शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं
काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला
‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
“भापमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”