देश

राज ठाकरेंचं ‘मिशन विधानसभा’; या मुद्द्यावर घेणार ममता बॅनर्जींची भेट!

मुंबई |  मनसे प्रमुख राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची 31 जुलै रोजी भेट घेणार आहे. ईव्हीएमविरूद्ध मनसेची भूमिका आग्रही आहे. याच मुद्द्यावर देशपातळीवर मोठं आंदोलन उभं करण्यासाठी राज ममतांची भेट घेणार आहेत.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने राज यांचा भेठीगाठीचा सिलसिला सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली.

राज ठाकरे 3 दिवसांसाठी कोलकाता दौऱ्यावर जाणार आहे. बुधवारी ते ममता बॅनर्जी यांची भेट घेतील. त्यानंतर ते आणखी काही महत्वाच्या नेत्यांची भेट घेऊन ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.

राज यांनी याच प्रकरणी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याजवळ आपलं गाऱ्हाणं मांडलं. दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आम्हाला आयोगाकडून फारशी अपेक्षा नाही. त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची??, अशी प्रतिक्रिया राज यांनी दिली होती.

कोलकाता दौऱ्यानंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. या भेटीत विधानसभा निवडणूक, ईव्हीएम यासह विविध राजकीय विषयांवर चर्चा करणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे 4 ऑगस्ट रोजी पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट केली.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यातील गहुंजे बलात्कारप्रकरणातील नराधमांची फाशीची शिक्षा रद्द; मरेपर्यंत जन्मठेप

-चहूकडून टीकेची झोड उठल्यानंतर ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी आझम खान यांचा माफीनामा!

-मनसेची ‘ही’ भूमिका आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-रोहित-विराटच्या वादाला नवं वळण; विराट पत्रकार परिषद घेणार!

-उदयनराजेंचं मी बघतो, तुम्ही पक्ष सोडू नका- शरद पवार

IMPIMP