राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!

मुंबई |  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्चला 14 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनसेचा वर्धापन दिन नवी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. पक्ष वाढीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय. वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून ते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

गेल्या महिन्यात 23 जानेवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेट स्थापन करणार असल्याचं म्हटलं होतं.

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. त्या दृष्टीने त्यांनी कामही सुरु केलं आहे. तसेच पक्ष वाढीसाठी ते विशेष लक्ष देताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कामगारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार कामगार मंत्र्यांना, मला नाही- अमोल कोल्हे

-“राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, पण लोकहिताच्या कामाला स्थगिती देऊ नका”

-जसं आपणं पंढरपूर- शिर्डीला जातो, तसं उद्धव ठाकरे अयोध्येला जातात- सुप्रिया सुळे

-“मंदिर मशिदीच्या ऐवजी शाळेत फेऱ्या मारत जावा; बघा काय बदल होतो”

-“गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर आहेत; त्यांची सल्तनत नेस्तनाबूत करा”