मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे. गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतलेल्या सभेत मनसे कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.
जमलेल्या माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो, असं म्हणत राज ठाकरेंच्या भाषणाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी लाॅकडाऊनबाबतच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.
उद्धव ठाकरेंना अचानक साक्षात्कार झाला. मोदी व्यासपिठावर होते, अमित शहा व्यासपिठावर होते तेव्हा त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री होणार असं सांगितलं होतं. मग काय झालं?, अचानक चित्र बदललं, असं म्हणत राज ठाकरे यांनी 2019 च्या निकालावर म्हणाले आहेत.
दरम्यान, पण नंतर बघतो तर काय? पाहतो तर काय जोडा वेगळाच होता. अशी टीका करताना राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल केली. ये शादी नही हो सकती, असं नंतर ठरलं, असं म्हणत राज ठाकरे यांनी टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं
काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला
‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा