मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोहिनूर मिल प्रकरणी ईडीकडून गुरुवारी चौकशी करण्यात आली. 9 तासांच्या ईडीच्या चौकशीला राज ठाकरे शांतपणे समोरे गेले. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावरु त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
मी त्यांना एकच गोष्ट सांगून आलोय. की अशा ईडीच्या कितीही चौकशा केल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे.
गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून ईडी कार्यलयाबाहेर बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. तसेच मनसेच्या अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पोलिसांन ताब्यात घेतलं होतं. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, अविनाश जाधव तसेच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
राज ठाकरेंचं कुटुंबीय जवळपास दोन तासांपासून बाहेर वाट पाहत होते. सकाळी राज ठाकरेंना सोडण्यासाठी आलेले कुटुंबीय बाजूच्याच हॉटेलमध्ये थांबले.
दरम्यान, तब्बल 9 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर रात्री 9 वाजता राज ठाकरे आपल्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी दाखल झाले.
महत्वाच्या बातम्या-
-…मग मी बोलले तर कुठे बिघडलं- अंजली दमानिया
-अजित पवारांसह या मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ; कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश
-एनएसयूआयच्या विद्यर्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातला चपलेचा हार
-नक्की काय आहे ‘मिशन टेस्ट वर्ल्ड कप’???
-‘या’ खेळाडूंना असणार इतिहास घडवण्याची संधी