“राज ठाकरेंच्या आवाहनामुळे राज्यातील कोरोना वाढला आहे”

औरंगाबाद |  काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं दिसत होतं. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळू-हळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमिवर सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागरिकांना काही निर्बंध घालून दिले आहेत. मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन राज्य सराकर करत आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वि.रोधात त.क्रार दाखल करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी दिलेल्या आवाहनामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, अशी त.क्रार अॅड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.  राज ठाकरे विना मास्कशिवाय फिरताना दिसतात. यावरुन त्यांना एका कार्यक्रमादरम्यान प्रश्न विचारला. त्यांनी चक्क मास्क न घालण्याचे आवाहन इतरांना केलं. या मुद्यावरुन अॅड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात त.क्रार केली असल्याचं समजत आहे.

मुंबईत एका कार्यक्रमावेळी राज ठाकरे विना मास्क दिसले. त्यावेळी पत्रकारांनी त्याविषयी विचारले असता, मी मास्क घालतच नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यानंतर नाशिक दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना राज ठाकरेंनी मास्क उतरवण्यास सांगितलं होतं.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील केली जात आहे. मात्र राज ठाकरेंसारखा जबाबदार नेता नागरिकांना मास्क न घालण्याचे आवाहन करतो. त्यांचं अनुकरण करण्याऱ्यांचंही मोठं प्रमाण आहे.

त्यामुळे राज ठाकरेच जर मास्क घालू नका असं सागत असतील तर लोक त्या का फॉलो करणार नाहीत?, असा सवालही असं अॅड. रत्नाकर चौरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच साथिच्या रोग प्रतिबंधात्मक कायद्याखाली राज ठाकरे यांच्यावर गु.न्हा दाखल करण्यात यावा, अॅड. रत्नाकर चौरे अशी मागणीही केली आहे.

दरम्यान, 1 मार्चपासून संपूर्ण देशात दुसऱ्या टप्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आज राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी लस घेतली आहे. त्यांनी ही लस नागपूरच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

ऑनलाईन सत्रादरम्यान वकिलाने जे केलं ते पाहून सॉलिसिटर जनरल म्हणाले आम्हालाही…

सर्वसामान्यांंना दिलासा देणारी बातमी! पाहा पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाले?

गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं ‘हे’ आव्हान

‘विराट मैदानात जितका आक्रमक आहे तितकाच तो…’; अनुष्काने सांगितलं ‘ते’ सिक्रेट

…अन् जुळता जुळता तुटलं; ‘तो हा नव्हेच’ म्हणत नवरीने लग्नमंडपातच मोडलं लग्न!