मुंबई | राज्याच्या राजकारणात मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या सभेमुळं जोरदार वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंनी आता आक्रमक हिंदूत्वाचा मार्ग अवलंबल्याची सर्वत्र चर्चा आहे.
गेल्या दोन महिन्यात राज ठाकरेंनी तीन मोठ्या जाहीर सभा घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत.
राज ठाकरेंनी मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये सभा घेत मशीदींवरील भोंगे उतरवण्याबाबत ठाकरे सरकारला परत एकदा अल्टिमेटम दिला आहे.
4 तारखेपर्यंत सर्व मशींदींवरी भोंगे उतरवण्यात यावेत अन्यथा परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी सरकारनं ठेवावी असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लवकर हा भोंग्यांचा विषय निकाली काढण्याचं आवाहन केलंय. अशातच मनसेसैनिकांना तयार राहाण्याचं आवाहन देखील राज ठाकरेंनी केलं आहे.
आता नाही तर कधीच नाही सर्व बंदी झुगारून एकत्र या असं आवाहन राज ठाकरेंनी केल्यानं आता प्रशासनाची धावपळ होणार हे मात्र नक्की आहे.
राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या शैलीत सर्वांना हिंदू म्हणून एकत्र येण्याची विनंती देखील केली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ
“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
“अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”
“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा