राज ठाकरेंच्या सभेआधी वसंत मोरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले…

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे. मात्र सभेआधी वसंत मोरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

मला राज ठाकरेंनी याबाबत विचारणा केली, तर मी त्यांना सांगेन. कारण संयम तुटण्याची वेळ कधीकधी येते. माझ्यापर्यंत विषय होता, तेव्हा मी सगळ्या गोष्टी रेटून नेत होतो. पण आज माझ्या कार्यकर्त्यांपर्यंत विषय आला आहे, असं वसंत मोरे म्हणालेत.  ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

मतभेद कुठेतरी मनभेदापर्यंत जायला लागले आहेत. ते जाऊ नयेत यासाठी मी प्रयत्न करतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून हे दाखवलं जातंय की आम्हाला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय, असंही वसंत मोरे म्हणालेत.

मला वाटतं पदाधिकारी हा पदाधिकारी असतो. तो कधीच कुणाचा नसतो. तुम्ही त्याला व्यवस्थित वागणूक दिली, तर तो तुमच्यासोबतच असतो. इथे वसंत मोरे किंवा अजून कुणाचा ग्रुप नाही. तो पक्षाचा ग्रुप आहे, असं ते म्हणालेत.

पक्षात हुकुमशाहीचा प्रकार सुरू आहे. कुणालातरी शहरावर वेगळ्या पद्धतीने वट बसवायचा आहे. तो कामातून त्यांनी बसवावा. अशा कारवाया करून कार्यकर्ते तुटतील, असं म्हणत मोरेंनी आपली नाराजी व्यक्त केलीये.

मी काल पक्षाच्या सर्व नेत्यांना रात्री माझं फेसबुक लाईव्ह टॅग केलं आहे. एखाद्या चॅनलवर दाखवलं, म्हणून त्याची कोणतीही सत्यता न पडताळता निलेश माझिरेंवर जी कारवाई केली, नंतर त्यांना जी वागणूक दिली की तू पक्षात राहणार आहेस का वगैरे. अशा पद्धतीने आजपर्यंत पक्षात कुणी बोलत नव्हतं, असं त्यांनी सांगितलं,

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा हा काय राष्ट्रीय प्रश्न आहे का?- शरद पवार 

SBI बँकेत अकाऊंट असणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ‘हा’ मेसेज आला असेल तर…

पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी 

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर