मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. शर्मिला ठाकरे सकाळी पुराचा तडाखा बसलेल्या सांगलीतल्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावाला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात करतील. शर्मिला ठाकरे सकाळी 11 वाजताच्या सुमारास ब्रम्हनाळ गावाला भेट देतील. ब्रम्हनाळ गावात झालेल्या बचावकार्यादरम्यान बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांना प्राण गमवावे लागले होते.
पूरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ येत आहे. बोट दुर्घटना झालेल्या ब्रम्हनाळ गावातून शर्मिला ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
शर्मिला ठाकरे दुपारच्या सुमारास सांगलीतल्या पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन पूरस्थितीची पाहणी करतील. शर्मिला ठाकरे मिरज शहरातल्या कृष्णा घाट परिसरातील पूरग्रस्त लोकांचीही भेट घेणार आहेत. तसंच जनावरांच्या छावणीची पाहणी करणार आहेत.
सांगली दौऱ्यानंतर शर्मिला ठाकरे कोल्हापूरच्या दिशेने रवाना होतील. कोल्हापुरात महापुराच्या विळख्यात अडकलेल्या शिरोळ, टाकवडे, इचलकरंजीतील पूरग्रस्तांची संध्याकाळी भेटही घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी करुन त्या मदत करणार आहेत.
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली भागात जनजीवन उद्ध्वस्त झालं आहे. पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठवा, असं आवाहन मनसेच्या विविध शाखांतर्फे करण्यात आलं होतं.
राज्य सरकारसह सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरील अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करत आहेत. तसेच सिनेसृष्टीतील काही कलाकारांनीही पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
सौ. शर्मिला राज ठाकरे ह्या १४ आणि १५ ऑगस्ट रोजी कराड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरातील पूरग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा तपशील खालील प्रमाणे. pic.twitter.com/gmFYrVFu1f
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 13, 2019
महत्वाच्या बातम्या-
-डोनाल्ड ट्रम्प काश्मीर मुद्द्यावरुन मध्यस्थी करणार नाहीत!
-“खरा तो एकची धर्म…” म्हणत उर्मिलाची पूरग्रस्तांना मदत
-राजस्थानमध्ये पोषण आहारातून 36 मुलांना विषबाधा
-पूरग्रस्त भागात शरद पवार स्वातंत्र्यदिन साजरा करणार
-“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा आहेत की फडणवीस???”