इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार- राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहिर केलं आहे. तसेच राज ठाकरेंनी विधानसभेच्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

मंत्रालयात आत्महत्या केलेले धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. याशिवाय नाशिकमधील शिवसेना नगरसेवक दिलीप दातार हे सुद्धा मनसेत दाखल झाले. हे दोघेही मनसेकडून निवडणूक लढवतील, असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

कोहिनूर मिल प्रकरणी ईडीची चौकशी झाल्यानंतर राज ठाकरे शांत होते.राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे.

अजित पवार यांनीही राज ठाकरे ईडीच्या चौकशीनंतर शांत झाले, असं म्हटलं होतं. मात्र राज ठाकरेंनी आज मौन सोडंलं. पाच तारखेला आपली पहिली प्रचार सभा पार पडणार असल्याचं सांगत जे इतके दिवस बोललो नाही ते आता बोलणार आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रचार सभेची जागा अद्याप ठरली नाही. मात्र त्याबाबत लवकरच कळवू, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-