तो अशक्यप्राय विजय कसा मिळवला???; दिनेश कार्तिकनं सांगितली राज की बात!

नवी दिल्ली | जीवनात कोणतीही गोष्ट नियोजन केल्याशिवाय पूर्ण होत नाही. कालच्या आयपीएल सामन्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. गोलंदाजांनी फलंदाजांना नेमकं कसं थांबवले, याबाबत दिनेश कार्तिक यांनी सांगितले आहे.

दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये कालचा आयपीएलचा सामना पार पडला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयलचा या मोसमातील १२ वा सामना झाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थानच्या फलंदाजी करणाऱ्या सेनेला निश्चित धावा करण्यापासून रोखले.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करून १७५ धावा केल्या. पण राजस्थान रॉयल संघाचे फलंदाज या धावांपर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने जिंकला. या सामन्यात नाईट रायडर्सच्या संघाचे युवा जलद गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि शिव मावी यांनी मोलाचे योगदान दिले.

सामन्यातील या युवा गोलंदाजांचे खेळ पाहून संघाचे कर्णधार दिनेश कार्तिक यांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. हा सामना संपल्यावर नाईट रायडर्सचे कर्णधार दिनेश कार्तिक म्हणाले,”ही खूपच खास गोष्ट आहे. हे खेळाडू बऱ्याच गोष्टींचा सामना करून इथपर्यंत पोहोचले आहे.”

पुढे बोलताना दिनेश कार्तिक म्हणाले,”हे खेळाडू इथे येऊन खेळणे आणि अशा पध्दतीची गोलंदाजी करणे, ही खूपच चांगली गोष्ट आहे.” या सामन्यात कमलेश नागरकोटी यांनी फक्त २ ओव्हर टाकल्या, त्यात त्यांनी १३ धावा देऊन २ विकेट घेतल्या.

त्यातच दुसऱ्या बाजूला युवा जलद गोलंदाज शिव मावी यांनी ४ ओव्हर टाकल्या, त्यात त्यांनी २० धावा दिल्या आणि २ विकेट घेतल्या. या सामन्याची मॅन ऑफ द मॅच शिवा मावी याला मिळाली. या दोन्ही गोलंदाजांमुळे राजस्थान संघाच्या धावांना आम्हला थांबवता आले.

हा खूपच उत्तम सामना झाला. अनेक गोष्टींनी मलाही खूप आनंद झाला. ज्या पद्धतीने गिल आणि रसेलने खेळायला सुरवात केली होती, ज्या पद्धतीने मॉर्गनने संघाला सांभाळले. यातच एक गोष्ट खूपच चांगली वाटली की, युवा खेळाडू झेल घेण्याचा प्रयत्न करत होते.

विकेट पाहिल्यावर थोडं वेगळंच वाटत होतं, कारण ते अगदी सरळच दिसत होतं. पण आम्ही जसं ठरवलं होतं, तसंच घडलं. मोठ-मोठ्या खेळाडूंविरुद्ध आम्ही आधीही खेळलो होतो, त्यामुळे आम्हाला ते कसे खेळतात, याचा अंदाज आला होता. मी एक गोष्ट ठरवली होती की, लाईन आणि लेंथमध्ये कोणतीच चूक करायची नाही, असं दिनेश कार्तिक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर

…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते