“तिकीट देत असाल तर पक्षात थांबतो नाही तर…”

नंदुरबार | पक्षाने तिकीट न दिल्यास राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा इशारा  नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी पक्षाला दिला आहे.

राजेंद्र गावित यांनी 2014 ला शहादा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.  यावेळी जर तिकीट दिलं नाही तर पक्ष सोडतो, असा पवित्रा गावितांनी घेतला आहे.

नंदुरबारमधल्या चारही जागा आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. हा जागा वाटपाचा तिढा न सुटल्यास आपण दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवू ,असा इशारा गावितांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

राजेंद्र गावित हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून शहाद्यात  सुरू आहेत. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री विजयकुमार गावितांचे ते बंधू आहेत.

दरम्यान, नवापूरचे नेते शरद गावित यांनीही तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-