नाशिक | त्र्यंबकेश्वरजवळ टायर फुटून कार नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात नाशिकच्या डॉक्टरचा मृत्यू झाला, तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलासह दोघं जण जखमी आहेत.
डॉ. संजय पोपटराव शिंदे, डॉ. जतिन संखे आणि शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित नाशिकहून पालघरमधील मोखाड्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात टायर फुटल्यामुळे डॉ. शिंदे यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ती कठडा तोडून थेट नाल्यात कोसळली.
अपघातात शिंदे यांना गंभीर मार लागला होता. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेऊन त्यांना कारमधून बाहेर काढलं.
दरम्यान, या अपघातामध्ये जखमी झालेल्या डॉ. जतीन संखे आणि रोहित गावित यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये प्रसाद ओक; ईडीच्या चौकशीवरुन सरकारला टोला??? – https://t.co/se3TeXp7Do @RajThackeray @Prasad_oak
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचीही चौकशी होऊ शकते- चंद्रकांत पाटील- https://t.co/0XgJuacKZm #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019
…तर मी पवारांची अवलाद नाही- अजित पवार – https://t.co/YcfjCOpAHy @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) August 24, 2019