महाराष्ट्राचा मंत्री कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत म्हणतात, ‘पाहतोच आता!’

मुंबई |  कर्नाटकातील बेळगावमध्ये हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी गेलेल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांच्या दादागिरीला सामोरं जावं लागलं आहे. कर्नाटक पोलिसांनी यड्रावकर यांना ताब्यात घेतलं. त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे.

बेळगावात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. याच कार्यक्रमासाठी राजेंद्र पाटील हे बेळगावात गेले होते. मात्र त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करण्याअगोदरच पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावर शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून त्यांना रोखलं गेलं आहे… महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय? मी ऊद्या बेळगावला जात आहे. पाहू काय घडतंय. जय महाराष्ट्र, असं ट्वीट करत संजय राऊत यांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत.

दरम्यान, नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यड्रावकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. यड्रावकर हे अपक्ष आमदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

-भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण

-रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

-बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

-गांधी-आंबेडकर-सावरकरांचा इतिहास सांगणं गुन्हा आहे काय?; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र