Rajendra Patni Passed Away l राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील कारंजा (वाशिम) येथील भाजप आमदार राजेंद्र पाटणी (Rajendra Patni) यांचे निधन झाले आहे.
राजेंद्र पाटणी यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X हँडलद्वारे शोक व्यक्त केला आहे. भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या या जाण्याने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.
Rajendra Patni Passed Away l उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शोक व्यक्त :
देवेंद्र फडणवीस यांनी ‘X’ वर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शोक व्यक्त करताना असे लिहले आहे की, ‘अतिशय दु:खद बातमी, विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी (Rajendra Patni) यांचे आज निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराने त्रस्त होते. ते या संकटातून बाहेर येतील अशी आशा आम्हा सर्वांना होती. पण आज त्याला जीव गमवावा लागला आहे.
Rajendra Patni Passed Away l ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपने गमावला आहे. पश्चिम विदर्भाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर असत. सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे असा त्यांचा सतत आग्रह होता. त्यांच्या निधनाने माझे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगी आम्ही राजेंद्र पाटणी यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
News Title : Rajendra Patni Passed Away
महत्त्वाच्या बातम्या-
मनोहर जोशींचा… भिक्षुकीपासून ते मुख्यमंत्री असा अंगावर काटा आणणारा संघर्षमय प्रवास एकदा वाचाच
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास जाणवेल
‘गावातील महिलेंनी त्याच्यावर बलात्काराचे..’; जरांगेंचा बारस्करांबाबत मोठा गौप्यस्फोट
‘तो नेता सांगतो तसंच…’; संगिता वानखेडेंचा जरांगेंवर अत्यंत धक्कादायक आरोप!
सिनेप्रेमींसाठी खुशखबर! उद्या अवघ्या 99 रुपयांत पाहता येणार चित्रपट