पुणे : जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु असतानाही महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या त्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतंच स्पष्ट झालं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यामुळे पुणेकरांसह राज्यात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.
कोरोनाग्रस्त दाम्पत्य हे 1 मार्चला पुणे विमानतळावर दाखल झाले. या दाम्पत्याचे थर्मल स्कॅनिंग झालं होत. मात्र त्यावेळी ते डिटेक्ट झालेले नाही. त्यानंतर 6 मार्चपर्यंत हे दाम्पत्य त्यांच्या घरी होते.
मात्र त्यानंतर काही लक्षणं दिसू लागल्यामुळे पुण्यातील संबंधित महिलेने दवाखान्यात दाखवलं. त्या परदेशाहून आल्या होत्या. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांच्यावर चाचणी केली. त्या चाचणीत हे दाम्पत्य पॉझिटिव्ह आढळलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”
-पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना
-गो कोरोना, कोरोना गो… रामदास आठवलेंची चीनी नागरिकांसोबत घोषणाबाजी; पाहा व्हिडीओ
-“आमच्यासाठी जी व्यक्ती चांगली ती शेवटपर्यंत चांगली असते”
-‘सावकारी कर्जमाफी’चा निर्णय भाजपच्याच काळातला- चंद्रकांत पाटील