मुंबई | कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत दिली जाणार आहे.
कोरोनाकाळात लाखो लोक कोरोनामुळे मृत्यू पावलेत. काही अल्पवयीन मुलांनी आई आणि वडील दोन्ही गमावल्यानं अनेकजण अनाथ झालेत. त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे.
काही वयस्कर व्यक्तींनी कुटुंबातील कमावती माणसं गमावली आहेत. त्यांनाही आर्थिक मदतीची गरज आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना काहीतरी आर्थिक मदत व्हाही हे लक्षात घेऊन शासनानं आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.
हे पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही अटी घातल्या गेल्या आहेत. कोरोनाचे निदान झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला असेल असल्यास मदत मिळणार.
मृत्यूच्या दाखल्यात कोरोनामुळे मृत्यू अशी नोंद नसली पण तरीही अटींची पूर्तता होत असली तरी 50 हजारांची मदत देण्यात येईल.
दरम्यान, राजेश टोपेंनी यावेळी बोलताना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा फैलाव वेगाने होत आहे.
या देशांमध्ये करोनाचा नवा व्हेरीयंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणं गरजेचं आहे. नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी आज मुंबई महापालिका प्रशासनाची महत्वाची बैठक होणार आहे.
या बैठकीत नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार आहे. दुसऱ्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राकेश झुनझुनवालांना मोठा धक्का; एका आठवड्यात झालं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं नुकसान
“अजूनही भाजप आणि शिवसेनेचं सरकार स्थापन होऊ शकतं”
भाजपला मोठं खिंडार पडणार?; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
अमित शहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मॉर्निंग वॉकसाठी टेरेसवर गेला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; कोल्हापूरमधील घटनेनं खळबळ