महाराष्ट्र Top news मुंबई

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; राजेश टोपेंनी केंद्राकडे केली ‘ही’ मागणी

Rajesh Tope

मुंबई | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान माजवलं होतं यावरून धडा घेत अनेक देशांनी खबरदारी म्हणून तातडीने काही नियमात बदल केले आहेत. हा नवा विषाणू सर्वात आधी दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे.

दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आली आहेत. ओमिक्रॉन (Omicron) हा खूपच घातक आणि झपाट्याने पसरणारा आहे. हेच पाहता महाराष्ट्राने आत्तापासूनच खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मोनिटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हेरिएंटपासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचे देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

विमान प्रवासासाठी 72 तास आधीचे कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं असून विमानतळावर कडक तपासणी केलं जातं आहे. तसेच क्वॉरंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्शवभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज आहे. राज्याला या संदर्भात अधिकार नसल्याने केंद्राकडे आम्ही याबाबत मागणी देखील केलीय. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी करून योग्य ती काळजी घेतली घातली जात आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलं असून केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असंही राजेश टोपे म्हणाले.

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराला शास्त्रीय भाषेत B.1.1529 या नावाने ओळखले जात होते. नंतर WHO ने त्याला ‘Omicron’ असं नाव दिलं गेलं.

या नव्या व्हेरिएंटमुळे केंद्र सरकार सतर्क झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत एक तातडीची बैठक घेतली.

या बैठकीत कोरोनासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच कोणती काळजी घ्यावी, काय खबरदारी घेण्यात यावी यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य विभागाच्या सचिवांनी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

खळबळजनक! दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

“मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे कमावलं ते विरोधी पक्षनेते म्हणून गमावलं” 

सेक्स व्हिडीओ प्रकरण, भय्यू महाराज प्रकरणात धक्कादायक खुलासा 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत ICMR चं मोठं वक्तव्य! 

 “उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात सगळ्यांना पुरुन उरले”