महाराष्ट्र Top news मुंबई

‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे

rajesh topee 7

मुंबई | आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा राजेश टोपेंनी दिला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाची पहिली लाट सप्टेंबर 2020 मध्ये आली होती. त्यानंतर दुसरी लाट एप्रिल 2021 मध्ये आली, त्यानुसार तिसरी लाट डिसेंबर महिन्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विद्यार्थी आणि लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे बहुतांश मुलांमध्ये कोरोनाविरुद्धच्या अँटिबॉडिज अगोदरच विकसित झाल्या आहेत.

महाराष्ट्रातीत 80 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असल्यामुळे त्यांना कोरोनाचा अधिक त्रास होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात तिसरी लाट आली तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, देशात कोरोनाची तिसरी तीव्र लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलंय.

तिसऱ्या लाटेची शक्यता नसल्याने बूस्टर डोस देण्याचीही आवश्यकता नसून लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं गुलेरिया म्हणाले.

सिरो-पॉझिटिव्हिटीचे प्रमाणही वाढलं आहे. सध्या बूस्टर डोस देण्याची गरज नाही. कदाचित भविष्यात त्याची आवश्यकता भासू शकेल, अस त्यांनी सांगितलं.

लसीकरणाची मोहीम वेगाने राबवली जात असून, कोरोनामुळे प्रकृती गंभीर होण्याच्या, रुग्णालयात दाखल होण्याच्या किंवा मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा 

एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार??? 

नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला झटका, केली ‘ही’ मोठी घोषणा 

शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना झापलं, म्हणाले…