Top news महाराष्ट्र मुंबई

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

rajesh topee 2

मुंबई | राज्यात कोरोना (Corona) रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लागण्याची शक्यता आहे. आता यावर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सातत्याने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागांशी चर्चा करत असतात. टास्क फोर्स, आरोग्य सचिव आणि मी देखील मुख्यमंत्र्यांना कोरोना परिस्थितीची माहिती दिली आहे. या सर्व माहितीवर सारासार विचार करुन मुख्यमंत्री निर्बंधांबाबत निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितलं.

लोकांचे व्यवसाय सुरु राहिले पाहिजेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे. त्यादृष्टीने निर्बंध लादताना मध्यबिंदू काढणं आवश्यक आहे. त्यामुळे विचार करुन निर्णय घ्यावे लागतात. मात्र, सध्याच्या घडीला लोकांची गर्दी टाळणे, हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात करोनाच्या तब्बल 41 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एकाही ओमायक्रॉनबाधिताचा समावेश नाही, याकडे राजेश टोपे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लहान मुले किंवा 18 वर्षांवरील कोणीही नागरिक असो, त्यांना करोनाची थोडीही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तातडीने चाचणी करुन घ्यावी, असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे

सर्वात जास्त मानधन घेणाऱ्यांच्या यादीत रश्मिकाचं नाव, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ कोटी