‘राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ पण…’; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना रूग्णांच्या वाढत्या आकडेवारीने सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबईतील जनता दरबार उपक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, ही वाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राजेश टोपेंनी यावेळी बोलताना दिली आहे.

वाढणाऱ्या कोरोना रूग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची लक्षणं आढळत असल्याचंही राजेश टोपे म्हणाले. बहुतांश कोरोना रूग्णांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं दिसत असल्याने अद्याप कोणताही नवा व्हायरस आढळून आला नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असली तरी ती मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, रायगड या मर्यादित क्षेत्रात वाढत आहे. या रूग्णवाढीकडे आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली.

राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे मुंबईत आढळून येत आहेत. मुंबईचा पॉझिटिव्हीटी दर हा 14 टक्क्यांवर पोहोचला असून रूग्णालयात दाखल होण्याची टक्केवारी मात्र दोन ते तीन टक्के आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचं व काळजी घेण्याचं आवाहन सातत्याने सरकारकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ कार चालवतात, हे सरकार तर भगवान चालवतो”

‘फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली’, दीपाली सय्यद कडाडल्या

रावसाहेब दानवेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले ‘विरोधकांनी माझ्या मागे….’

“प्रिय अण्णा…. किमान वाढदिवसाच्या निमित्ताने तरी त्यावर बोलाल हीच अपेक्षा”

…तर महिन्याला पाच हजार रुपयांपर्यंत मिळेल पेन्शन; सरकारची भन्नाट योजना