राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 49वर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता 49वर पोहोचली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं असून सर्वांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

गेल्या 4 दिवसांमध्ये रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारी यंत्रणा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीनं पावलं उचलत आहे. सर्वांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी बाळगण्याची गरज आहे. असं ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

31 तारखेपर्यंतचे दहा दिवस खूप महत्त्वाचे आहेत फेज 2 मधून फेज 3 मध्ये जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं राजेश टोपेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लोकल, बस या सगळ्यांची गर्दी कमी करा, दिलेल्या सूचनांचं पालन करा, लक्षण लपवू नका, घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन  केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बायकोला न सांगता मैत्रीणीला घेऊन इटलीला फिरायला गेला अन् कोरोना घेऊन परत आला

-“आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकलं जात नाही”

-चिकन, मटन खाल्ल्याने कोरोना होत नाही- शरद पवार

-कौतुकास्पद.. आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय अन् आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी!

-महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला, आणखी 2 महिलांना कोरोनाची लागण