मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगानं संपूर्ण जगभराचं टेंशन वाढवलं आहे. कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे नागरिकांच्या मनातही धास्ती निर्माण झाली होती.
कोरोनाचा प्रभाव आता आटोक्यात येत आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी झाली असून मृतांची संख्यांही आटोक्यात आली आहे.
कोरोना निर्बंधांतून आता सुटका होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
राज्यात निर्बंध हळहळू शिथील करतोय, सणवार साजरे करताना काळजी घ्या, शिस्त पाळून सण साजरे करा, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
गुढीपाडवा हा सण आपण घरे साजरा करतो. तरीही हा सण साजरा करण्यास परवानगी दिली आहे. 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. ती ही मोठ्या उत्साहात साजरा करावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
सावर्जनिक ठिकाणी मास्क वापरा, परदेशातील स्थिती पाहता मास्क वापरणं गरजेचं आहे. निर्बंध मोट्या प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. काही प्रमाणात हे निर्बंध कायम आहेत. मात्र, मास्क मुक्तीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, असं टोपे म्हणाले.
मास्क लगेच हटवले जाणार नाही. कारण कोरोनाची लाट जरी ओसरली असली तर धोका अजूनही कायम आहे.
जर कुणी बाधित असेल तर त्यामुळे इतर लोक बाधित होऊ शकतात, त्यामुळे घाईघाईने मास्क बंदी हटवली जाणार नाही, असं टोपेंनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या –
नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ; ‘ते’ प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा आवाज कोणी बंद करु शकणार नाही”
“भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण…”
1 एप्रिलपासून कोरोना निर्बंध हटवणार?; ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय
मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ जिल्ह्यात 15 दिवसांची जमावबंदी