मुंबई | वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्यात. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला आहे. यावर बोलताना आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असून याबाबत 15 दिवसांनी परिस्थिती पाहून पुनर्विचार केला जाईल. लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण कमी असल्याने अनेकांनी शाळा सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत 15 दिवसांचा अंदाज घेऊन मुख्यमंत्र्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण 90 टक्के लोकांना पहिला डोस दिला आहे. आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण 62 टक्क्यांपर्यंत लोकांना दुसरा डोस दिला आहे, असं राजेश टोपे म्हणाले.
जे लोकं डोस घेत नाहीत त्यांची जनजागृती करुन त्यांनाही डोस दिला जाईल. 15 ते 18 वयोगटातील 42 टक्के मुलांना आपण लस आतापर्यंत दिली आहे, असं देखील टोपे यांनी सांगितलं.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ब्रीच कँडीच्या मॅनेजमेंटला त्यांनी विनंती केली की, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसंदर्भातील सर्व अपडेट माध्यमांना द्यावेत. तसेच मॅनेजमेंट आणि मंगेशकर परिवार एकत्रित चर्चा करून आरोग्य विषयक माहिती माध्यमांना देतील, असंही त्यांनी सांगितलं.
देशात कोरोना विषाणू (Corona) संसर्गाचं संकट वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 2 लाख 71 हजार 202 कोरोना रुग्णांची नोंद झालीये.
महत्त्वाच्या बातम्या
“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”
शॅाकिंग… राजीनामा विराट कोहलीचा; हादरा बसला रोहित शर्माला!
शेतात रहायला गेलेल्या सलमानचं शेजाऱ्यासोबत भांडण, या कारणामुळे खटला दाखल
‘धोका अजून टळलेला नाही, Omicron नंतर…’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा
“विराट मान उंच ठेव… तू कर्णधार म्हणून जे मिळवलं, ते फार कमी जणांना जमलंय”