“लॉकडाऊनचे चटके लोकांनी भोगलेत, मात्र…”; मोठा निर्णय होण्याची शक्यता

मुंबई | कोरोना महामारीनं गेल्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात सर्वांचं नुकसान केलं आहे. गतकाही दिवसांमध्ये राज्यात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येच्या वाढत्या वेगाबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोेपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजेश टोपे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या नव्या ओमिक्राॅन या व्हेरियंटनं जगामध्ये रूग्णसंख्या वाढायला सुरूवात झाली होती. ओमिक्राॅनचा युरोपियन देशांमध्ये प्रभाव हा वाढलेला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. अनेक राजकीय नेते सध्या कोरोनानं त्रस्त आहेत. अशामध्ये राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

राज्य सरकारनं रूग्णसंख्येत वाढ होवू नये म्हणून राज्यात निर्बंध लावायला आता सुरूवात केली आहे. राज्य सरकारनं सध्या राज्यभर नाईट कर्फ्यू लागू केला आहे.

लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, सभांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या सरकारनं विविध क्षेत्रातील निर्बंधामध्ये कठोरता आणण्याचा निश्चय केला आहे.

लाॅकडाऊनचा परिणाम अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो, त्यांच्या पोटाचा प्रश्न लाॅकडाऊनमध्ये निर्माण होतो. लोकांनी लाॅकडाऊनचे चटके सोसले आहेत, असं संवेदनशील वक्तव्य टोपे यांनी केलं आहे.

सध्या राज्यात लाॅकडाऊन लावण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही. माध्यमांनीही तशी भीती नागरिकांना घालू नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

सध्या सरकार लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देत असल्याचं टोपे म्हणाले आहेत. शाळा, माॅल्स, चित्रपटगृहे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचंही टोपे म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्ससोबत बैठक घेतली पण या बैठकीत लाॅकडाऊनबाबत कसलीही चर्चा झाली नाही, असं टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट

WHOच्या मुख्य वैज्ञानिकांनी भारताला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला, म्हणाले…

“देशात कोरोनाची तिसरी लाट भाजपमुळेच आली”

“चार दिवसात कोकणात काय काय घडलं अमित शहांना सर्व सांगणार”

‘… तर 2022 मध्ये कोरोना संपणार’; WHO प्रमुखांनी दिली दिलासादायक माहिती