मुंबई | फँड्री या मराठी चित्रपटातील शालू या नावाने गाजलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पहायला मिळतं. ते नेहमी वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अशातच तिची एक पोस्ट व्हायरल होत आहे.
राजेश्वरी खरातने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यावर तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्राविषयी भावनिक पोस्ट लिहिली आहे. तिच्या ही पोस्ट तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
‘तो आला, बसला, आणि गेला पण सर्वांच्या नजरा मात्र तिच्यावरच अडल्या…’, अशा आशयाची पोस्ट राजेश्वरीने लिहिली आहे. स्त्रीने असे काम करने योग्य नवे परंतु पुरुषाने केलेले अतिउत्तम, असं राजेश्वरी पोस्ट लिहीत म्हणाली आहे.
काही काम धंदा का करीत नाहीस, फक्त पैश्यांसाठी लाचारीचे सोंग घेतीस. पण तुम्ही तुमच्या घरात धुणे भांड्याचे तरी काम देताल का एवढेच सांगा, असा सवाल देखील राजेश्वरीने या पोस्टच्या माध्यमातून केला आहे.
तुमच्या घराच्या धुणे भांड्याचे जरी काम दिलं तरी त्या मागचा हेतू हा सर्वांनाच माहिती असतो. गल्लीकडे येताना तोंड लपवून येतात पण येतात मात्र नक्की, असंही राजेश्वरीने पोस्टमध्ये म्हणते.
थोड्यावेळासाठीच खेळण घेतल्यासारखं आमची आबरू काढून घेता आणि मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी किंमत देता. सर्वांना हे खेळण आयुष्यात एकदातरी पाहिजे असतंच पण कोणी याला कायमच आपलं करून घेण्याची हिंमत ठेवतात का?, असा प्रश्न तिने विचारला आहे.
कायमच आपलं करून घेण्याची हिंमत नाही, कारण वेश्या व्यवसाय करणारी स्त्री चारित्र्यहीन असते आणि बाकीचे सर्व अगदीच पवित्र असतात, असंही राजेश्वरी पोस्टमध्ये लिहिते.
समाजात आणखी बर्याच काही गोष्टी वेश्येबद्दल बोलल्या जातात पण कोणी मात्र कधी त्यांच्या हितात बोलत नाही, सर्वजण फक्त ऐकून मजा घेतात, असंही ती म्हणाली.
कृपया थोडीफार दया त्यांच्यावरही करा ज्या आपल्या घरातील माता भगिनींसारखे आयुष्य कधीच जगू शकत नाहीत, असंही भावनिक आवाहन देखील राजेश्वरीने केलं आहे.
राजेश्वरी खरातच्या फँड्री या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. या चित्रपटातली शालू आणि जब्याची प्रेम कहाणी प्रचंड गाजली होती. त्यानंतर सोशल मीडियावर देखील तिचा चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
पाहा पोस्ट-
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या-
मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”