“सिंधुदुर्ग हा जलदुर्ग स्वतः शिवरायांनी बांधला… तो वर्ग 2 मध्ये येतो का?; राजीव सातव यांचा सवाल

मुंबई | राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या सगळ्या बातम्या अफवा असून वर्ग 1 चे किल्ले शिवाजी महाराजांचे असून त्यांच्याबद्दल कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचं पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं होतं. त्यावर सिंधुदुर्ग हा जलदुर्ग स्वतः शिवरायांनी बांधला, तो वर्ग 2 मध्ये येतो का? असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील 25 ऐतिहासिक किल्ल्याचं हेरिटेज हॉटेल किंवा विवाह स्थळांमध्ये रुपांतर करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. ‘हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसी ने 25 किल्ल्यांची निवड केलेली आहे. 

राज्यात वर्ग 1 आणि वर्ग 2 असे दोन प्रकारचे किल्ले आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात. तर सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात, असं जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान, जयकुमार रावल यांनी सिंधुदुर्ग हा जलदुर्ग स्वतः शिवरायांनी बांधला तो वर्ग 2 मध्ये येतो का? याचं उत्तर तातडीने द्यावं, असं सातव म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-