“काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?”

सातारा : माझा काटा काढायला कोण आलं तर ‘आरे ला का रे’ करावं लागेल. काट्याने काटा काढावाच लागेल, असा इशारा नुकतेच भाजपमध्ये गेलेल्या शिवेंद्रराजे भोसलेंनी दिला होता. यावर आता कल्पनाराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काट्याने काटा काढायला आम्ही काय मेलेल्या आईचं दुध पिलंय का?, असं वक्तव्य करत कल्पनाराजेंनी शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

ज्या शरद पवारांनी आणि त्यांच्या पक्षाने 40 वर्षापेक्षा अधिक काळ तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला नेतृत्वाची संधी दिली. त्याच पवारांना उतारवयात फसवून तुम्ही गद्दारी केली आहे, अशी टीका कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंवर केली आहे.

गद्दारीचा हा इतिहास तुम्हाला नवा नाही आणि तरीही तुम्ही काट्याने काटा काढायची भाषा करता? याद राखा पुन्हा असली भाषा कराल तर येणाऱ्या निवडणुकीत कुणाचा काटा निघेल हे तुम्हाला समजेलच, असे म्हणत कल्पनाराजे यांनी शिवेंद्रराजेंवर टीका केली. 

1996साली तुमच्या वडिलांनी सतीश जाधव यांना उदयनराजेंकडे पाठवले. मला आमदारकीला मदत करा, मी तुम्हाला खासदारकीला मदत करतो, असा शब्द अभयसिंहराजेंनी दिला होता. मात्र, तो न पाळता अभयसिंहराजेंनी आमदारकीला उदयनराजेंचा उपयोग करुन घेतला आणि खासदारकीला त्यांना फसवले. अभयसिंहराजेंनी उदयनराजेंना अनेकदा फसवले. तीच परंपरा तुम्ही चालवत आहात, असा इतिहास सांगत कल्पनाराजेंनी शिवेंद्रराजेंना सुनावलं आहे.

जरा इतिहास तपासून घ्या, जुन्या गोष्टी आठवा. तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना जे काही मिळालं ते आमच्यामुळं हे तुम्ही एवढ्या लवकर विसरता, असंही कल्पनाराजे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, 1999 साली तुम्हाला बंधू नाही तर बंदूूक आठवत होती आणि आता तर काट्याने काटा काढायची भाषा वापरत आहात. येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा काटा निघणार हे जनतेनं ठरवलं आहे, असं कल्पनाराजेंनी वक्तव्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री म्हणतात….युतीचा ‘फिफ्टी-फिफ्टी’ फार्मुला जरा वेगळाच!

-उपमुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट!

-राष्ट्रवादीची भाकरी करपण्यासाठी स्वत: शरद पवार जबाबदार- विनायक मेटे

-चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर देवेंद्र फडणवीस म्हणतात…