मुंबई | हैदराबाद येथे पशुवैद्यक महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिला जाळण्यात आल्याने देशभरात संतप्त प्रकिया उमटत आहेत. संसदेत देखील या घटनेचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
हैदराबादमध्ये घडलेली घटना देशाला लाज वाटण्यासारखी आहे. या घटनेचे प्रत्येकाला दु:ख झाले असून यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल. महिलांविरोधात होणारे गुन्हे रोखण्यासाठी आणि नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायदा करणार आहोत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली आहे.
समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनीही या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारले पाहिजे, अशा कठोर शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, हैदराबाद येथे एका 27 वर्षीय महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. काही अनोळखी व्यक्तींनी प्रियांका रेड्डी या महिलेवर बलात्कार करुन तिला जाळून मारले असल्याचं नंतर उघड झाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“पंकजा मुंडे यांची ठाकरे कुटुंबीयांशी जवळीक” – https://t.co/DFLk2BlJV3 @TawdeVinod @Pankajamunde @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
देवेंद्र फडणवीसांना मिळाला ‘सागर’ बंगला; छगन भुजबळ पुन्हा ‘रामटेक’वासी – https://t.co/DSgqJlWJLw @Dev_Fadnavis @ChhaganCBhujbal
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019
काय पोरकट मुख्यमंत्री आहे, भीक का मागतोय- निलेश राणे – https://t.co/y3SWoCNj3H @meNeeleshNRane @uddhavthackeray #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019