“जर कोणी भारताला छेडलं तर त्याला आम्ही सोडणार नाही”

नवी दिल्ली | भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला कडक शब्दांत संदेश दिला आहे. जर कोणी भारताला छेडलं तर भारत त्याला सोडणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत आहे. भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनण्याच्या तयारीत आहे, असं त्यांनी म्हटलं.

भारत “झिरो-सम गेम”च्या कूटनीतीवर मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवत नाही. ‘झिरो-सम गेम’ ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एका बाजूचे नुकसान दुसऱ्या बाजूच्या नफ्या इतके असते, असं ते म्हणाले.

भारताचे कोणत्याही एका देशाशी चांगले संबंध असतील तर याचा अर्थ असा नाही की, त्याचे इतर कोणत्याही देशाशी संबंध बिघडतील, असंही त्यांनी म्हटलं.

‘भारताने अशा प्रकारची मुत्सद्देगिरी कधीच स्वीकारली नाही. भारत हा कधीही स्वीकारणार नाही. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ‘झिरो-सम गेम’वर आमचा विश्वास नाही, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

“पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोपर्यंत…”, भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य 

टेन्शन वाढलं! चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर WHO ने दिला ‘हा’ गंभीर इशारा

‘…अन् पवारांची जादू चालली’, गुलाबराव पाटलांनी सांगितला पहाटेच्या शपथविधीचा किस्सा!

आरामदायी Marutiची नवी 7 सीटर कार लाॅन्च; किंमत पण फारच कमी…

रणबीर-आलियाचं लग्न तर झालं पण शेजाऱ्यांनी घोळ घातला, प्रकरण पोलिसात गेलं अन्…