Top news मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत यांनी केलं असं काही; आजारी चाहत्याला बसला सुखद धक्का!

नवी दिल्ली | अभिनेते रजनीकांत यांचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. कारण त्यांचा साधेपणा आणि त्यांच्या विविध स्टाईल चित्रपट रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. रजनीकांत नेहमी त्यांचा चाहत्यांना पाठिंबा देत असतात.

रजनीकांत त्यांच्या चाहत्यांना कायम भेटायला जात असतात. चेन्नईतील राघवेंद्र मंडपममध्ये ते आपल्या चाहत्यांना भेटतात, बोलतात आणि चर्चा करतात. तसेच त्यांच्याबरोबर फोटोही काढतात. पण नुकतेच रजनीकांत एका गोष्टीमुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी आपल्या चाहत्याला फोन करून त्यांच्या तब्येतीविषयी विचारले होते. ४५ वर्षीय मुत्थामानी नावाच्या चाहत्याने सर्वात प्रथम रजनीकांत यांचा चाहत्यांचा क्लब तयार केला होता.

सध्या मुत्थामानी हे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रजनीकांत यांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी या चाहत्याला फोन केला. त्यांच्या तब्येतीविषयी विचारले.

त्याचबरोबर रजनीकांत यांनी मुत्थामानी यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यातच आता १०-१२ दिवसांपूर्वीच रजनीकांत यांचा एक चाहता खूपच डिप्रेशनमध्ये होता.

ही बातमी जेव्हा रजनीकांत यांनी समजली तेव्हा त्यांनी या चाहत्याला फोन केला. यावर तो चाहता म्हणाला की, रजनीकांत सरांचा आवाज ऐकून मला खूपच आनंद झाला. माझ्यासाठी ते माझे आई, वडील आणि सर्वकाही आहे.

सध्या कोरोना संकटामुळे आणि किडनीच्या आजाराने एक चाहता झुंज देत होता. रजनीकांत यांनी या चाहत्याला १९ सेकंदांची व्हॉईस नोट पाठवली होती. यात त्यांनी मुरली यांचा आत्मविश्वास जागृत करण्याचे काम आणि त्यांची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला.

रजनीकांत हे दरबार या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात सुनील शेट्टी, नयनतारा आणि निवेता थॉमस सारखे दिग्गज कलाकार आहे. आता रजनीकांत अनन्थे या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात खुशबू सुंदर, कीर्ती सुरेश, नयनतारा आणि मीना सारखे स्टार्स यात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणात नवा ट्विस्ट; आता रियाच्या वकिलांनी केला ‘हा’ नवा दावा

मोबाईल स्लो झाला असेल तर या 3 ट्रिक वापरा; अगदी नवीन मोबाईलसारखा चालेल!

सक्सेस मिळत गेलं तसतशी श्रद्धा कपूर… जया साहानं केले धक्कादायक खुलासे

“नवाजुद्दीन सिद्दीकीनं माझी फ.सवणूक करून माझ्यावर बला.त्कार केला”

आता रियानं सुशांतवरच केला धक्कादायक आरोप; म्हणते, सुशांतने आपल्या जवळच्या लोकांचा…