मुंबई | भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. सिंचन घोटाळ्याचे वलय विधानसभा विरोधी पक्षनेेते अजित पवार यांच्याभोवती आहे.
अजित पवारांची (Ajit Pawar) सिंचन घोटाळा प्रकरणातून अद्याप पूर्णपणे सुटका झाली नाही. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते रणजीत निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांनी खळबळजनक दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच बड्या नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. तसेच लवकरच त्यांची नावे देश पातळीवर कळविणार आहोत, असे निंबाळकर म्हणाले.
राष्ट्रवादीतील दहा मोठ्या नेत्यांपैकी पाच मोठ्या नेत्यांच्या फाईली आमच्याकडे आलेल्या आहेत. यांच्यापैकी काही नेते मंत्री देखील होते. यासाठी ईडी (Enforcement Directorate) आणि सीबीआयच्या (CBI) हस्तक्षेपाची गरज आहे, असे निंबाळकर म्हणाले.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपावर देखील निंबाळकर यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादीत अनेक चोर आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. निंबाळकर यांनी अद्याप कोणाचे नाव सांगितलेले नाही.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कंबोज यांनी एक ट्विट केले होते. त्यावेळी भाजपेत्तर पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती. कंबोज ईडीचे अधिकारी आहेत का, त्यांना कोणावर कारवाई होणार आहे, हे अगोदर कसे काय कळते, असे प्रश्न विरोधकांनी विचारले होते.
यावेळी ईडीच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. ईडीकडून कारवाई होणार असलेल्या नेत्यांची माहिती सर्वात अगोदर भाजपच्या लोकांना कशी काय कळते, ईडी भाजपसाठी काम करते का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
महत्वाच्या बातम्या –
मेहबुबा मुफ्तींचे मोंदीवर गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्या राज्याला…
मोठी बातमी! श्रीवर्धन समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ
बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
“…म्हणून नितीन गडकरींचं महत्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न”
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ निर्णय