“RSS दहशतवादी संघटना असल्याचे माझ्याकडे पुरावे”

बंगळुरू |   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा खळबळजनक आरोप भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. RSS वर त्वरित बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे.

राजरत्न आंबेडकर यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी संघटना असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत, असं म्हणत असतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातला व्हिडिओ पाहिलाच असेल. आरएसएस ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत, असं ते म्हणत असल्याचं व्हीडिओत दिसत आहेत.

भारतीय सैन्याकडचा दारूगोळा संपला होता. बंदुका….स्फोटकं संपली होती तेव्हा RSS ने स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते? तेव्हा त्यांच्याकडे हा सगळा साठा कुठून आला होता? असा सवाल राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ज्या संघटनेकडे स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब आहे अशी संघटना दहशतवादी संघटना नाही का? याच संघटनेचे अनेक कार्यकर्ते दहशतवादी कारवायांत पकडले गेले आहेत. ही संघटना लवकरात लवकर बंद झाली पाहिजे, असं राजरत्न म्हणाले आहेत.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंविरोधातील मारहाण-खंडणी प्रकरणी सातारा न्यायालयाने दिला मोठा निर्णय!

‘ठाकरे सरकार म्हणजे मल्टीस्टार सिनेमा’, तुम्हाला काय वाटतं??; अजित पवारांचं भन्नाट उत्तर

-प्रजासत्ताकदिनी काँग्रेसने पाठवलेली ‘ही’ खास भेट पंतप्रधान मोदींनी नाकारली!

-यापुढे मी मराठवाड्यात समाजसेवक म्हणून काम करणार- पंकजा मुंडे

-फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धक्काबुक्की!