“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”

मुंबई | महाराष्ट्रात अडकलेले हजारो परप्रांतिय मजूर मुंबई सोडून त्यांच्या गावी जात आहेत. मात्र राजस्थानी संघटनेने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या मुंबईने पोसलं, त्या मुंबईला संकटकाळात सोडून जाणार नाही, अशी भूमिका राजस्थानी संघटनेने घेतली आहे.

मुंबई, महाराष्ट्रात राहात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. हे राज्यच आता आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे. संकटकाळात मुंबई, महाराष्ट्र सोडून जाणार नाही, असं जितो या राजस्थानी संघटनेनं म्हटलं आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसासारख्या राज्यातील नागरिक परत जात असताना, राजस्थानवासीयांनी मुंबई आणि महाराष्ट्रासोबत कायम राहण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, राजस्थानच्या लोकांनी महाराष्ट्र सोडून जाऊ नये, असं आवाहनही त्यांनी इतर मजुरांना केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-चीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प

-कोणत्याही लसीशिवाय कोरोना निघून जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य

-“उपलब्ध झालेले रोजगार हीच संधी आहे… मराठी तरूणांनो नंतर गळे काढून रडू नका”

-भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

-रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत