ईव्हीएम गेलं तर भाजपही जाणार; राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा

मुंबई : ईव्हीएमविरोधात राज्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले आहेत.याच मुद्द्यावरुन आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणाा साधला आहे. 

एकदा ईव्हीएम गेलं तर भाजपही जाईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरेंसह इतर विरोधी पक्षाचे नेतेही ईव्हीएम हटवण्याची मागणी करत आहे.

जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

गेल्या शुक्रवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह इतर विरोधी पक्षातील नेते एकत्र आले आणि पत्रकार परिषद घेत त्यांनी ईव्हीएमला विरोध दर्शवला. 

आगामी विधानसभा निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमुखाने केली. याच मुद्द्यावर जनजागृतीसाठी राज्यभरातून रॅली काढण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं.

मुंबईत 21 ऑगस्टला रॅली काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनसेतर्फे स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंनी ईव्हीएमसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात जाऊन भेट घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींनीही राज ठाकरेंच्या भूमिकेली पाठिंबा दर्शवला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांनाही आवडला असणार!!!”

-“आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता”

-सौ सौ सलाम आपको…!; परेश रावलांनी केलं मोदींचं कौतुक

-मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; जम्मू-काश्मीरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय

-जम्मू काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय