मुंबई | मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राजू पाटील यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना एक सल्ला देखील दिला आहे.
आता ‘U”T’urn नको! बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणारा हिस्सा व त्यासाठी BKC व इतर ठिकाणी भू संपादीत करायला लागणारे हजारो कोटी रूपये राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरावे. बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडालायची हीच वेळ आहे, असं राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी राजू पाटील यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच राज्याला सक्षम विरोधीपक्ष मिळावा ही राज ठाकरेंची भूमिका होती. त्यानुसारच आम्ही पुढं गेलो आहेत, असं राजू पाटील यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, आम्ही आमची भूमिका जोमानं पुढे मांडू. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणणार आणि जे चूक आहे त्याला विरोध करणार, असंही राजू पाटील म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्र्यांकडून नितेश राणेंची ‘ती’ मागणी मान्य – https://t.co/vIfLzpwflF @OfficeofUT @NiteshNRane
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
अजित पवार भाजपसोबत का गेले होते?; शरद पवारांचा खुलासा – https://t.co/AjH4W9Okwn @PawarSpeaks @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
गोपीनाथ मुंडे साहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेल; उद्धव ठाकरेंचा पंकजांना रिप्लाय – https://t.co/YDdYpKz8nN @OfficeofUT @Pankajamunde
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 2, 2019