पुणे | काँग्रेस-राष्ट्रवादीला मी साधू-संत असल्याचं सर्टिफिकेट देत नाही. ज्या पद्धतीनं भाजप-शिवसेना सत्तेचा गैरवापर करत आहे. त्यांच्याविरूद्ध लढायचं असेल, त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर विरोधकांना एकत्र यावं लागेल, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ते ‘बीबीसी मराठी’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.
शिवाजी महाराजांनी सांगितलंय, मुघलांशी लढायचं असेल तर कुतुबशाही- आदिलशाहीशी हात मिळवणी करावी लागेल. त्याच न्यायानं आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आहोत, शिवाजी महाराजांनी आदिलशहाला काय चांगलं असल्याचं सर्टिफिकेट दिलं होतं का?, असंही ते यावेळी म्हणाले.
सरकार आणि चळवळींमध्ये कायमच संघर्ष असतो. याआधीही आम्ही बरीच आंदोलनं केली मात्र मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना गेल्या 5 वर्षात जो त्रास झाला, तो इथून मागे नव्हता झाला, असंही शेट्टींनी म्हटलं.
काँग्रेस-राष्ट्रवादी साधू-संत नाहीत मात्र त्यांच्यासोबत राहिलो तर किमान आमचं मत मांडण्याचा, आमचे प्रश्न मांडण्याचं स्वातंत्र्य तरी आम्हाला राहील. म्हणून आम्ही आघाडीसोबत आहोत, असं मत त्यांनी यावेळी मांडलं.
दरम्यान, भाजपसोबत आम्ही होतो. त्यांनी आम्हाला गंडवलं. आमच्यासारख्या पक्षाचे लचके तोडले, असा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
फडणवीसांच्या काळात राज्यातील जातीय तणावात वाढ; पोलिस खात्याचा अहवाल https://t.co/HdvHjmFdCC @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
“डोक्यावर छत्रपतींची पगडी घालण्याआधी आपण त्यासाठी पात्र आहोत का?” https://t.co/mbFBXVCPtq @amolmitkari22 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
शरद पवारांकडे “तो” एक दुर्गुण आहे- जितेंद्र आव्हाडhttps://t.co/bMZDXsC2n1 @Awhadspeaks @NCPspeaks @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019