कोल्हापूर | कडकनाथ कोंबडी पालन करणाच्या आमिषाने कोट्यावधी रूपयांची फसवणूक केलेली संस्था कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला होता. याच टीकेला प्रत्युत्तर देताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
राजू शेट्टींनी भर चौकात कादगोपत्री पुरावे दाखवावेत. पुरावे दाखवले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. आणि पुरावा दाखवता येणार नसेल तर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी भर चौकात विष्ठा खावी, असं खोत म्हणाले आहेत.
राजकीय लढाई राजकारणाच्या पातळीवर लढायला हवी, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. आम्हीही लढाऊ आहोत. राजू शेट्टी यांना कोंबडीचे तंगडे खायची सवय आहे. त्यांना दुसरे काही आठवणार नाही. तंगडे खाणाऱ्यांनी आपल्या आईची शपथ घ्यावी, असंही खोत म्हणाले.
दरम्यान, राजू शेट्टी यांनी खोत यांना कोंबडी चोर म्हटले होेते. त्यावरूनच सदाभाऊ खोत भडकलेले पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मेगागळती पण भाजपमध्ये मेगाभरती नाही; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण – https://t.co/2gQJRPLsQQ @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
बुम बुम बुमराहची भेदक गोलंदाजी.; केला ‘हा’ नविन विक्रम – https://t.co/c3VukRAIH9 @Jaspritbumrah93
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019
सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतरही गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब! – https://t.co/80ndoVCFby @supriya_sule @NaikSpeaks @NCPspeaks @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 1, 2019