महाराष्ट्र मुंबई

शिवसेना एवढे दिवस काय झोपली होती का?; शिवसेनेच्या मोर्चावर राजू शेट्टी कडाडले

मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पिकविमा कंपन्यांविरोधात सत्ताधारी शिवसेनेने धडक मोर्चा काढला आहे. त्यावर स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांनी टीका केली आहे. 

शिवसेना शेतकऱ्यांसाठी आता रस्त्यावर उतरली आहे एवढे दिवस झोपली होती का?, असा सवाल करत राजू शेट्टींनी टीका केली आहे. 

जर शिवसेनेला शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येत नसेल त्या मोर्चाचा काहीही उपयोग नाही, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत. शिवसेनेच्या या मोर्चावर विरोधकांकडून टीका केली जात आहेत.

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समधील ‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे. या मोर्चात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सामिल झाले आहे.

पिकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावेत, विमा कंपन्यांनी आपली मनामानी करणं थांबवावं शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करावी, या सगळ्या मुद्द्याला धरुन शिवसेनेने हा मोर्चा काढला आहे.

दरम्यान, काँग्रेसनेही शिवसेनेने काढलेल्या मोर्चावर टीका केली आहे. शिवसेनेने काढलेला मोर्चा ही  नौटकी आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

IMPIMP