मुंबई | अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात आले आहेत. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत आहे. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 75 हजार रुपये व थकीत वीज बिलासाठी कृषी संजीवनी योजना आणली असती तर अधिक आनंद झाला असता, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहनपर देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली होती. तसेच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.
दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं आहे. शिवाय दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांनाही मदत करणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे.
शेती, शेतकरी आणि ग्रामीण महाराष्ट्राला डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत.नियमित कर्ज भरणार्यांना 75 हजार रुपये व थकीत वीज बिलासाठी कृषी संजीवनी योजना आणली असती तर अधिक आनंद झाला असता. @AjitPawarSpeaks @ANI @uddhavthackeray @CMOMaharashtra
— Raju Shetti (@rajushetti) March 6, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-मराठा समाजासाठी अजित पवारांची मोठी घोषणा!
-पुण्याचा ट्राफिक प्रश्न सोडवण्यासाठी गडकरी अन् अजित पवारांची युती…!
-अजित पवारांचं बजेट नाही तर जाहीर सभेतील भाषण; देवेंद्र फडणवीस यांची सडकून टीका
-अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर पेट्रोल डिझेल महागणार!