देशाच्या शेतीचं आकारमान केवढं??… तरतूद किती कमी करताय; राजू शेट्टी अर्थसंकल्पावर नाराज

नवी दिल्ली |  केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला. आजच्या बजेटमध्ये शेतीसाठी अर्थमंत्र्यांनी कमी निधीची करतूद केली आहे. भारतीय शेतीचा आकारमान पाहता हा निधी अत्यंत कमी आहे, अशी नाराजी शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली. अर्थसंकल्पानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आजच्या बजेटमध्ये काहीच नवीन नाही. आजच्या बजेटमधून साखर उद्योगासंदर्भात कोणताही नवीन आणि ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारने मांडलेल्या बजेटवर नाराजीवर व्यक्त केली आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतीसाठी भरीव निधी दिला असं सांगितलं जातंय. मात्र शेतकऱ्यांसाठी हा बुडबुडा आहे. फक्त योजना आखून शएती सुधारत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतोय. आत्महत्या वाढतायेत. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या सगळ्या गोष्टींकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केलंय, असं राजू शेट्टी म्हणाले.

सरकारने प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटींची तरतूद केली तर 1 लाख 23 हजार कोटींची जलसंधारण ग्रामीण विकासासाठी तरतूद केली. मात्र देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता ही तरतूद खूप तुटपुंजी आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोहम्मद शमी सध्याच्या घडीचा जगातला सर्वोत्तम गोलंदाज; शोएब अख्तरची स्तुतीसुमनं

-आता मोबाईलप्रमाणेच वीजेसाठीही प्रीपेड सुविधा; मोदी सरकारचा मोठा निर्णय+

-बेरोजगारीचं काही करणार आहात की नाही?? सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधी तुटून पडले!