राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणाले…

कोल्हापूर | राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेच्या काही जागा रिक्त होत आहेत. त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे. राष्ट्रवादीच्या या ऑफरवर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे.

ऑफर स्वीकारायची की नाही हा निर्णय त्यांच्याकडून उत्तर आल्यानंतर घेऊ. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी स्वाभिमानीसाठी राष्ट्रवादीने एक जागा सोडायचं ठरलं होतं. आता ती द्यायची की नाही केव्हा द्यायची, शब्द पाळायचं की नाही हे त्यांच्या नेतृत्त्वावर अवलंबून आहे. मी फक्त जे ठरलं आहे त्याची आठवण करुन दिली, असं राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

जयंत पाटील यांनी याबाबत प्रस्ताव दिला असून शरद पवारांसोबत पार पडणाऱ्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल असं राजू शेट्टींनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

-“देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार”

-नाभिक आणि धोबी व्यावसायिकांसाठी नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी

-‘धड खोटंही बोलता येत नाही’; व्हीडिओ पोस्ट करत ‘या’ अभिनेत्याची अमित शहांवर टीका

-राष्ट्रवादीकडून ‘या’ नेत्याला आमदारकीची खुली ऑफर… पवारांचीच तशी मनोमन इच्छा!

-युवकांनो घराबाहेर पडून मिळेल ते काम स्वीकारा- रोहित पवार