‘विनोदाचे बादशहा राजू श्रीवास्तव कालवश’

नवी दिल्ली | हिंदीतील विनोदाचे बादशहा (Comedy King Raju Shrivastav) आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS) शेवटचा श्वास घेतला. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव मागील महिन्यात दिल्लीत मुक्कामी होते. यावेळी व्यायामशाळेत व्यायाम करताना त्यांना हृद्यविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर शर्तीचे उपचार देखील सुरु होते. उपचारांनी त्यांचे शरीर साथ देत नव्हते. ते काही दिवसांपूर्वी शुद्धीवर देखील आले होते. पण त्यानंतर त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली.

राजू श्रीवास्तव यांनी विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना भरपूर हसविले. त्यांची बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यातील भाषेची शैली त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेली होती.

त्यांनी काही चित्रपटांत देखील कामे केली होती. पण त्यांचे एकपात्री सादरीकरण (Stand up Comedy) प्रेक्षकांना भरपूर भावले होते. त्यांनी आपल्या सादरीकरणात लोकांची टिंगल आणि नक्कल केली आणि लोकांना भरपूर हसवले.

महत्वाच्या बातम्या – 

“रामदास कदमांनी महाराष्ट्रात कुठेही फिरावे, त्यांच्या…” शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचे थेट आव्हान

शरद पवारांची पत्राचाळ घोटाळ्यात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे शरद पवारांपर्यंत? भातखळकरांची चौकशीची मागणी

रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणी दाढी…”

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी! मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय