मुंबई | राज्यातील सहा राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून 10 जून रोजी मतदान होईल.
राज्यसभेसाठी 15 राज्यांमधील 57 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. येत्या जुलै महिन्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. त्याआधी आकड्यांच्या दृष्टीने राज्य सभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्रातील भाजपचे तीन खासदार निवृत्त होत आहेत. परंतु, महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात.
राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. यात भाजपचे सात, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, काँग्रेसचे तीन, रिपाई एक आणि एका अपक्ष खासदाराचा समावेश आहे.
या निवडणुकीने राज्यसभेतील बरीच गणितं बदलणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील या सहा खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे.
या निवडणुकीसाठी 24 मे रोजी अधिसूचना निघेल. तर 31 मे ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. अर्जाची छाननी 1 जून रोजी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख 3 जून असेल.
सर्व 57 जागांवर 10 जून रोजी सकाळी 9 वाजता मतदान होईल. 10 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल, अशी माहिती आयोगाने दिलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
“आणखी दोन वर्ष आम्ही गुण्यागोविंदाने पार करू, 2024 मध्ये परत एकदा निवडून येऊ”
संभाजीराजेंनी उचललं मोठं पाऊल, पत्रकार परिषद घेत केली ‘ही’ घोषणा
उत्तर कोरियात कोरोनाचे दोन रूग्ण आढळताच किम जोंगची मोठी घोषणा!
केवळ अफलातून! गणेश मंडळाचा अध्यक्ष ते आमदार, असा होता रमेश लटकेंचा प्रवास
सदावर्ते निघाले अयोध्येला! अयोध्येतील साधु-संतांनी आमंत्रण दिल्याचा दावा