मुंबई | छत्रपती संभाजीराजेंनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. संभाजीराजेंनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. संभाजीराजेंनी अपक्ष आमदार आणि सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.
छत्रपती संभाजीराजेंच्या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचा छत्रपती संभाजीराजेंना पाठिंबा आहे असं सांगितलं.
मात्र, शिवसेना नेते अनिल परब यांनी शिवसेनेकडून सहावा उमेदवार देणार असल्याचं सांगितलं आहे. शिवसेनेकडून सहाव्या उमेदवाराची घोषणा करण्यात आल्याने संभाजीराजेंची राज्यसभेची वाट खडतर होत आहे.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होत आहे. त्यासाठी भाजपचे दोन, शिवसेना एक, राष्ट्रवादी एक आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ आहे.
संभाजीराजेंना अर्ज दाखल करण्यासाठी 10 अनुमोदक आमदारांची आणि निवडून येण्यासाठी 42 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांचाही कार्यकाल संपत आहे. संजय राऊत यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र, शिवसेनेने दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेलं नाही.
शिवसेनेच्या निर्णयाने संभाजीराजेंची अडचण होणार आहे. शिवसेनेने संभाजीराजेंना सहाव्या जागेसाठी ऑफर दिल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेची सहावी जागा दिली जाईल, अशी अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यातील सभेवरून दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान, म्हणाल्या…
अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा
रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा