राकेश झुनझुनवाला यांनी ‘या’ स्टॉकमधील गुतंवणूक केली कमी!

मुंबई | सध्या दिवसेंदिवस शेअर बाजारातील गुंतवणुक वाढताना पहायला मिळत आहे. काही प्रमाणात रक्कम योग्य अशा शेअरमध्ये गुंतवून फायदा मिळवता येऊ शकतो.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात दररोज मोठ्या घडामोडी घडत असतात. अशात काहींना प्रचंड मोठा फायदा मिळला आहे.

देशातील नावाजलेले आणि दिग्गज गुंतवणुकदार म्हणून राकेश झुनझनवाला यांना ओळखण्यात येतं. परिणामी त्यांच्या पोर्टफोलिओवर सर्वांच्या नजरा असतात.

नवीन वर्षात राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओत बदल केले आहेत. परिणामी त्यांच्या पोर्टफोलिमधील या बदलाची सध्या बाजारात चर्चा आहे.

राकेश झुनझुनवाला यांनी टार्क लिमीटेड या आपल्या पोर्टफोलिमधील महत्त्वाच्या शेअरमधील हिस्सेदारी काढून टाकली आहे.

टार्क लिमीटेडनं वर्षभरात जबरदस्त रिटर्न दिला आहे. परिणामी या शेअरमधील गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात फायदा झालेला पहायला मिळाला आहे.

बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्या कंपनी असणाऱ्या टार्कनं गुंतवणुकदारांना एका महिन्यात तब्बल 112 टक्के रिटर्न दिला आहे. दरम्यान या शेअरची किंमत 24.30 वरून 51.65 पर्यंत गेली आहे.

सप्टेंबर महिन्यापर्यंत राकेश झुनझुनावाला यांच्याकडं या कंपनीचे तब्बल 46 लाख 95 हजार शेअर्स होते. पण नंतर त्यांनी आपल्याकडील शेअर्स कमी केल्याचं पहायला मिळालं आहे.

दरम्यान, राकेश झुनझुनावाला सध्या भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आहेत. त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात शेअर्सचं एकत्रिकरण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

लॉकडाऊनबाबत राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘ती’ पुन्हा येतेय…, टाटाची जबरदस्त कार लवकरच येणार बाजारात 

लस न घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा, मुंबईतून आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

लांबसडक केसांसाठी करा फक्त ‘हे’ घरगुती उपाय, केसगळतीही थांबणार

झटपट वजन कमी करायचंय? मग हिवाळ्यात भाकरी खा… होतील फायदेच फायदे