नवी दिल्ली | चित्रपटसृष्टीतील ड्रामा क्वीन राखी सावंत अडचणीत सापडली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत राहणाऱ्या राखी सावंतला आदिवासी समाजातील कपड्यांवरून खिल्ली उडवणं महागात पडलं आहे.
झारखंडच्या एससी-एसटी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राखीच्या विरोधात हा एफआयआर आदिवासी समाजाची प्रमुख संघटना मध्य सरना समितीने दाखल केला आहे.
राखी सावंतने अस्वच्छ कपडे परिधान करून आदिवासी समाजाची बदनामी केली आहे, असं समितीच्या वतीनं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर आता राखीच्या अडचणी वाढल्या आहेत.
आदिवासी समाजातील लोक असे कपडे घालत नाहीत. बेली डान्सचे कपडे घालून याला आदिवासी पेहराव म्हणणे आक्षेपार्ह असून, यामुळे समाजातील लोकांचा अपमान होत असल्याचे केंद्रीय सरना समितीचे अध्यक्ष अजय तिर्की म्हणाले आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखीने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिने स्वत:ला घाणेरड्या कपड्यात आदिवासी म्हटलं होतं. या प्रकरणाची प्राथमिक तपासणी करून लवकरात लवकर राखीला अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझं वैयक्तिक कुठलंही बिल नाही, माझी आई आजारी होती तेव्हा…”
“मी माईकवर टॅप करून सांगितलं होतं…”; जयंत पाटलांचा मोठा खुलासा
IPL 2022: चेन्नई-मुंबईमध्ये आज महा’मुकाबला’; रोहितची मुंबई आज भोपळा फोडणार का?
अरे भाई भाई भाई! हलगीच्या तालावर तरुणाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल