मनोरंजन

अभिनेत्री राखी सावंतचं लग्न ठरलं; पाहा कोण आहे राखीचा होणारा नवरा…

मुंबई :  आपल्या नाटकी स्वभावामुळे अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. एखाद्या विषयावर बॉलिवूडमध्ये घमासान सुरु आहे आणि त्यावर राखी सावंत बोलली नाही, असं सहसा होत नाही. नुकत्याच नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादात देखील राखी सावंतने उडी घेतली होती. नाना आणि तनुश्रीपेक्षा जास्त फुटेज राखीनं खाल्लं होतं. तीचे या काळातील आरोप प्रत्यारोपांचे व्हीडिओ चांगलेच व्हायरल झाले होते. आता हीच राखी सावंत लग्न करायला निघाली आहे. स्वयंवर नव्हे तर राखी खरंच लग्न करत आहे. 

राखीच्या घरीसुद्धा लगीनघाई-

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन असल्याचं चित्र आहे. अनुष्का शर्मा, सोनम कपूरनंतर दीपिका पादुकोनने लग्न केलं आहे. आता प्रियांका चोप्रा बोहल्यावर चढणार आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये लगीनघाई असल्याचं दिसतंय. इतक्या अभिनेत्रींची लग्नं होत आहेत म्हटल्यावर त्यात राखीसुद्धा कशी मागे राहील? राखीने सुद्धा आता लग्न करायचं मनाशी पक्कं केलं आहे आणि तीने यासाठी चक्क वर देखील शोधला आहे. 

कोणासोबत करतेय राखी लग्न? 

राखी सावंतसोबत कोण लग्न करणार?, असा प्रश्न तुमच्या मनात आला असणार. तर दीपक कलाल असं राखीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. तुमच्यापैकी अनेकजण त्याला ओळखत असतील. कारण राखीप्रमाणे दीपक देखील सोशल मीडिया सेन्सेशन आहे. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियात तुफान लोकप्रिय होत असतात. मूळचा काश्मीरचा असलेला दीपक स्वतःला ‘सुपरस्टार ऑफ काश्मीर’ म्हणून घेतो. त्याला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं आहे. मात्र दीपकला त्याची फिकीर नाही. सोशल मीडियात प्रसिद्धीच्या झोतात राहणं त्याला आवडतं. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. यूट्यूबवरील त्याचे व्हीडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. दीपकला पाहिल्यावर तुम्ही नक्कीच म्हणाल, सारख्याला वारकं मिळालं!

पाहा राखीच्या होणाऱ्या नवऱ्याचे काही व्हीडिओ-

राखीने स्वतः शेअर केली लग्नपत्रिका-

दीपक कलालसोबत लग्न करत असल्याची माहिती स्वतः राखी सावंतने दिली आहे. तीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लग्नपत्रिका शेअर केली आहे. लॉस एंजेलिसमध्ये दोघे विवाहबद्ध होत असल्याचं या लग्नपत्रिकेत लिहिण्यात आलं आहे.

 

View this post on Instagram

 

????????????????????????????????????????????????????????????????????????????????????????

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

तनुश्री दत्ता प्रकरणानंतर दीपक कलाल सातत्याने राखी सावंतवर टीका करणारे व्हीडिओ मीडिया टाकत होता. एका व्हीडिओत तर त्याने राखीला लग्नासाठी आव्हान दिलं होतं. राखीने दीपकचं हे आव्हान धुडकावलं होतं. दीपक कलालसोबत लग्न करण्याऐवजी मी आत्महत्या करेन, असं राखीनं म्हटलं होतं. मात्र आता हीच राखी दीपकसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली आहे.

पाहा राखी नेमकं काय म्हणाली होती-

राखी खरंच लग्न करणार की प्रसिद्धीसाठी खटाटोप?-

राखी सावंत खरंच दीपक कलालसोबत लग्न करणार की हा तीने प्रसिद्धीसाठी चालवलेला नवा स्टंट आहे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण याआधीही राखीने स्वतःचं स्वयंवर रचलं होतं. या कार्यक्रमाद्वारे तीला चांगला टीआरपी मिळाला. ती प्रसिद्धीच्या झोतात राहिली. मात्र आता तीला प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी खटपट करावी लागत आहे. नवनव्या आयडिया लढवाव्या लागत आहेत. स्वयंवर रचून राखीने लग्न केलं नाही, त्यामुळे ती दीपकसोबत तरी लग्न करेल का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.